HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री !

मुंबई | “चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री आहेत. लोकांकडून पाच-दहा हजार रुपये उसने मागणारा माणूस आज लोकांच्या घरी गेला की किती पैसे पाहिजेत असे विचारतो. माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची माहिती आहे. मी त्यांच्याबद्दलची सगळी माहिती, पुरावे घेऊन येतो. त्यांनी माझ्याबद्दलचे पुरावे घेऊन यावे”, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर कारखानदारांसोबत सेटलमेन्ट केल्याचा आरोप केला होता. हा आरोप चंद्रकांत पाटील यांनी सिद्ध करुन दाखवावा, असे आव्हान राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

“मी कारखानदारांसोबात सेटलमेन्ट करून माझे घर भरले असे चंद्रकांत पाटील म्हणतात. भाजपकडे शंभर ते सव्वाशे साखर सम्राट आहेत. माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची संपूर्ण माहिती आहे. त्यांनी अभियंत्यांकडून किती घेतले, ठेकेदारांकडून किती घेतले, मातीत किती घेतले ही सगळी माहिती घेऊन पुरावे घेऊन मी बिंदू चौकात येतो. त्यांनीही त्यांच्याकडील माझी माहिती घेऊन यावे”, असे राजू शेट्टी म्हणाले.

Related posts

राजकारण व्यासपीठ आणि छत्रपती

News Desk

मोदींनी देशाच्या धमन्यांत जे स्फुल्लिंग चेतवले त्याचे दृष्यफळ दिसू लागले !

News Desk

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळांना तुर्तास दिलासा 

News Desk