HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : विजयसिंह मोहिते-पाटील देखील मनाने भाजपमध्येच आहेत !

मुंबई | माढ्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज (२० मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. “विजयदादांच्या आशीर्वादानेच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते-पाटील देखील मनाने भाजपामध्येच आहेत”, असे मोठे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. “माढामध्ये असलेला मोहिते-पाटील कुटुंबाचा मान भाजपमध्ये कधीही कमी होऊ देणार नाही. माढामध्ये भाजपचाच उमेदवार जिंकून येणार”, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दिला आहे.

मोहिते-पाटील यांनी मंगळवारी (१९ मार्च) अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यात आपण भाजप प्रवेशाबाबत ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. “तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. या मेळाव्यात तब्बल ५,००० कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत ही सगळी निवडणुकीची जुमलेबाजी सुरूच राहील !

News Desk

दाऊदसाठी आता भीक मागितली जाते मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली !

News Desk

आपला पराभव होणार याचा अंदाज असल्यानेच पवारांनी बारामतीबाबत ‘ते’ विधान केले !

News Desk