HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : पोटी जन्म घेतला म्हणजे राजकीय प्रश्न कळतीलच असे नाही !

बीड | “पोटी जन्म घेतला म्हणजे राजकीय प्रश्न कळतीलच असे नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला व्यक्तीच बीडचा खासदार होणार”, असा दावा करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “एका कुटुंबाला बीडच्या जनतेने खूप प्रेम दिले. मात्र बीडच्या जनतेला त्यातून काय मिळाले ? गेल्या ५ वर्षांमध्ये कधीही न दिसलेल्या खासदार निधी देखील खर्च करू शकल्या नाहीत. मग त्या दबंग कशा ?”, असे सवालही धनंजय मुंडे यांनी विचारले आहे.

“बीडच्या जनतेने एका घराला प्रचंड प्रेम दिले. मात्र, बीडच्या जनतेला काय मिळाले ? जनतेने निवडून देऊनही गेल्या ५ वर्षात त्या कधीही दिसल्या नाहीत. पोटी जन्म घेतल्याने राजकीय प्रश्न समजतातच असे नाही. ज्यांना लोकांसाठी खासदार निधी देखील खर्च करता आला नाही त्या दबंग कशा असू शकतात ? म्हणूनच आता शेतकर्‍यांशी नाळ जोडलेला व्यक्तीच खासदार होईल”, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बीड मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MarathaReservation : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची विधेयकात तरतूद

News Desk

MCA निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलारांची युती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

जोपर्यंत काश्मीरमध्ये हिंदू राजा होता तोपर्यंत हिंदू-शीख सुरक्षित होते !

Gauri Tilekar