HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : मला राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही !

मुंबई | पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार का ? अशी चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केले आहे. “मला राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही”, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनाम्याबाबतचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

“मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून सुरू केलेले राजकारण हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आणि अयोग्य आहे. याचा मी निषेध करतो”, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. “मी पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी जो निर्णय घेईन तो तुम्हाला सांगेन”, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. मुलासाठी संघर्ष उभा राहणे चुकीचे असल्याचे देखील यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • माझ्या मुलासाठी संघर्ष होतोय हे चुकीचे आहे.
  • काॅंग्रेस पक्षकडून काही जागा मागितल्या, जागांची आदला बदली बाबत चर्चा झाली
  • अहमदनगरमध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झालेली आहे, म्हणून या जागेची मागणी काँग्रेसकडून केली केली
  • खुप चर्चा झाल्या, योग्य समन्वय करण्यासाठी खूप प्रयत्न केले
  • भाजपमध्ये जाण्याच्या बाबतीत सुजयने माझ्याबरोबर काही चर्चा केली नाही
  • राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या वडीलांच्या बाबतीत केलेले विधान हे अत्यंत चुकीचे, मला याबबत खूप दुःख झाले आहे. ते हयात नसताना केलेली टीका ही दुर्देवी
  • शरद पवार यांच्या टिकेमुळे सुजयने हा निर्णय घेतला असावा.
  • आघाडी धर्माला काही गालबोट लागेल असे मी वागलो नाही, शरद पवार यांनी दोन वेळाही विधाने केले आहे, मला याचे दुःख झालेले आहे
  • काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींची मी वेळ मागितली आहे, पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य आहे
  • बाळासाहेब थोरात हायकमांडपेक्षा मोठे समजतात त्यांना मी उत्तर द्यायला बांधील नाही.
  • मी माझ्या मुलाविरोधात प्रचार करणार नाही.
  • मला संशयाचे वातावरण तयार करायचे नाही.
  • शरद पवारांच्या मनात आमच्या कुटुंबीयाबाबत द्वेश आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोशल मीडियावर जाहीरातींवर राजकीय पक्षांनी खर्च केले तब्बल ५३ कोटी रुपये

News Desk

#LokSabhaElections2019 : अयोध्येतून होणार प्रियांका गांधींच्या रथयात्रेला सुरुवात

News Desk

मोदी हत्येचा कट रचणा-यांचा निषेध | आठवले

News Desk