HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : पार्थ पवार यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही !

मुंबई | माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले पुत्र पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. “पार्थ पवार यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल”, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये उपस्थित असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

“मी पार्थचा प्रचार करण्यासाठी पनवेलमध्ये आलेलो नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी आलो आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे तीन पक्ष निश्चित एकत्र आहेत. बाकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल देखील अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच गैरहजर | शरद पवार

News Desk

गेहलोत यांच्याकडे सोपविली जाणार काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी ?

News Desk

… तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, अण्णा हजारेंचा इशारा

News Desk