HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

नवी दिल्ली | भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा हे लवकरच भाजपला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे नेते असूनही शत्रुघ्न सिन्हा हे कायमच भाजपवर टीका करत आले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेकदा उघडपणे भाजपवर नाराजी व्यक्त करीत काँग्रेसचे कौतुक केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना पटना साहिबमधून तिकीट नाकारले असून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना पटना साहिबमधून भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराज असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांना काँग्रेसकडून आगामी निवडणुकांसाठी पटना साहिबमधून उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे जर भाजपकडून पटना साहिब मतदारसंघाची उमेदवारी रविशंकर प्रसाद यांना मिळाली तर रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात कडवी टक्कर होऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डिजिटल व्यवहारासंबंधी फसवणूकीवर बंदी घालण्यासाठी आरबीआयचे नवे नियम लागू

News Desk

शेट्टींच्या वक्तव्यावर पवारांचे टीकास्त्र

News Desk

दीड महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा सर्वात मोठी हंडी फोडली! – मुख्यमंत्री

Aprna