HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडे ६६० कोटींची संपत्ती

भोपाळ | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांना आज (१० एप्रिल) छिंदवाडामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नकुलनाथ यांनी प्रतिज्ञापत्रात ६६० कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. नकुलनाथ यांच्याकडे ६१५.९ कोटींची जंगम मालमत्ता आहे, तर ४१.७७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. पत्नी प्रिया यांच्याकडे २.३० कोटींहून अधिक जंगम संपत्ती आहे. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर संपत्ती नाही.

तसेच नकुलनाथ यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. नकुल याच्यासोबत कमलनाथ यांनी देखील छिंदवाडा विधानसभा पोट निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. त्यावेळी कमलनाथ यांनी अर्जात त्यांनी त्यांच्याकडे ४०.५ कोटींची जंगी मालमत्ता तर ८४ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे जाहीर केले होती. या दोघांच्याही मालमत्ता एकत्र केल्या तर कमलनाथ यांच्या कुटुंबाकडे एकूण ८०० कोटींच्या जवळपास संपत्ती असल्याचे समजते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या छातीत संसर्ग

News Desk

भाजपचे नाराज खासदार उदित राज यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

News Desk

विरोधकांना देशासोबत उभे राहण्यात संकोच वाटतो !

News Desk