HW News Marathi
राजकारण

मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्यास काँग्रेसचा स्पष्ट नकार

मुंबई | महाआघाडीत मनसेला सामावून घेण्यास काँग्रेस स्पष्ट नकार कळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या दोघांनी मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. काँग्रेस आणि मनसेसोबत वैचारिक मतभेत असल्यामुळे अशा पक्षांना महाआघाडीत सामील करून घेणे अवघड असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

समविचार धारेच्या पक्षांनी एकत्र येवून भाजपचा लोकसभा निवडणुकीत परावभ करण्यासाठी महाआघाडीत मनसेचा समावेश करण्यात यासाठी अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी जावून भेट घेतली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीने महाआघाडीत सामील होण्याबाबत चर्चा झाली असून त्यांना काय देता येईल याचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आला आहे. आता त्यांनी निर्णय करायचा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहींना हे आरक्षण फार काळ टिकू नये असे वाटते !

News Desk

#MarathaReservation : विधेयक न्यायालयात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करू !

News Desk

“मुख्यमंत्री म्हणजे, आकाशाला हात लागले…”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna