HW News Marathi
राजकारण

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Mahant Sunil Maharaj) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे सुनील महाराज महंत आहेत.  महंत सुनील महाराज यांनी मातोश्रीवर आज (30 सप्टेंबर) उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हातात शिवबंधन बाधले. महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश हा अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मोठा धोका मानला जातो.

सुनील महाराज यांच्यासोबत मराठवाड्यातील बंजारा नेते रविकांत राठोड यांच्या हाती देखील उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बाधले आहे. तर सुनील महाराज यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला बंजारा समाजाचा नवा चेहरा मिळाल आहे. सुनील महाराज यांना शिवसेनेत प्रवेशानंतर लोकसभा किंवा विधानसभेत संधी देण्याची शक्यता वर्तवली जाते.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड मंत्री पद सोडावे लागले होते. यावेळी महंत सुनील महाराज हे राठोड यांच्या पाठिशी बंजारा समाजाला उभे करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. “राज्यभरातील 1.5 ते 2 कोटी बंजारा समाज बांधवांना न्याय देऊ शकते आणि सत्तेत वाटा देखील देऊ शकते”, असे सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हणाले.

बंजारा समाजातील कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत – उद्धव ठाकरे

“नवरात्रीच्या मुहूर्तावर बंजारा समाजातील महंतांनी शिवसेनेत प्रवेश केला असून साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा… मी सुनील महाराज यांचे स्वागत करतो. तसेच बंजारा समाजातील कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत. बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही”, असे उद्धव ठाकरेंनी सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याबाबत अंदाज वर्तविता येऊ शकत नाही !

News Desk

“शेअर बाजाराचा हिशोब भाजपला द्यावा लागेल”, संजय राऊतांचा इशारा

Aprna

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शरद पवार यांची पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna