Site icon HW News Marathi

शिंदे सरकारने बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा केली पास; तर महाविकास आघाडी फेल

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा पास झाले आहे. शिंदे-भाजप सरकार 164 मतांनी आज (4 जुलै) बहुमत चाचणीची विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडी सरकार 99 मतांनी बहुमत चाचणीत फेल झाले आहेत.  विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत देखील काल (3 जुलै) 164 मतांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा विजयी झाला आहे.

दरम्यान, आज सभाभृहात अध्यक्षांच्या आगमनानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यानंतर शिंदे सरकारमधील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शकाचा ठराव सभागृहात मांडला आहे. विधानसभेत बहुमत चाचणी ही शिरगणतीने पार पडली.

बुहमत चाचणीच्या वेळी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचा क्रमांक येताच सभागृहात ईडी ईडी अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यावेळी सरकारई म्हणाले, “मी तुम्हाला अर्ध्या तासांनी तुम्हाला उत्तर देईन,” असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला. या बहुमत चाचणीत समाजवादी पार्टीचे आबू आझमी हे तटस्थ होते.

 

Exit mobile version