HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार !

मुंबई | फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चितपणे पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी (९ जून) दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील याबाबत विधान केले आहे. “येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल”, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु होत्या.

भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अमित शहा यांनी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भाजपच्या कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन, मंत्रीमंडळ विस्तार, महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी आवश्यक निधी आदींच्या बाबतीत शहा यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

Related posts

काँग्रेस पक्ष बिंडोक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले

News Desk

आंदोलनामधील आत्महत्या थांबवण्याची जबाबदारी आयोजकांचीच | उच्च न्यायालय

Gauri Tilekar

बीड जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार

News Desk