Site icon HW News Marathi

वेदांता प्रकल्पावरुन सुधीर मुनगंटीवारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

मुंबई | “आरोप करणाऱ्यांना फक्त राजकारण करायचे असून त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही देण घेणे नाही”, अशी टीका करत महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना प्रत्युत्तर दिले. वेदांता सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला घेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच रायगडमधील अजून एक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जात असल्याचा मोठा खुलासा त्यांनी काल (14 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन केला होता. या आरोपांवर सुधीर मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आरोप करणाऱ्यांना फक्त राजकारण करायचं असून त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही देण घेणं नाही. त्यांचा राजकारण सत्तेचा आहे आणि फक्त आपल्या परिवाराची उन्नती व्हावी, आपल्या परिवाराचे भाग्य बदलाव यासाठी असून राज्याच्या भाग्यशी त्यांचा काहीही संबंध नाही ” असा पलटवार त्यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, “नवीन प्रकल्प महाराष्ट्रात आणन्यासाठी सरकार तर प्रयत्न करेल, त्याचसोबत मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री हे या दृष्टीने या राज्यामध्ये औद्योगिक शेत्रा मध्ये वाद व्हावी, उद्योग वादाचे तसेच राज्यात लघु उद्योग मध्यम उद्योग वादावे या दृष्टीने सुद्धा काही धोरणात मूलभूत बदल करण्याचा राज्याचा विचारहर्त आहे” आणि त्याच सोबत विश्वास व्यक्त करत ते म्हणाले राज्यात अनेक मोठे उद्योग आणि प्रकल्प निश्चित येतील.”

आदित्य ठाकरे नेमके काय म्हणाले

आदित्य ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “जेव्हा महाराष्ट्रासारखे राज्य असेल आपण आपल्या मेरिटवर पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, महविकास आघाडी सरकार असताना हे सगळे नीट चालत होत. पण, सरकार बदलण्यानंतर वेगळी व्यवस्था आल्यानंतर जी बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे या मुख्यमंत्र्यांनी 40 आमदारांसोबत 2 महत्वाचे प्रकल्पही तिथे नेऊन गेले”.

 

 

Exit mobile version