Site icon HW News Marathi

समाजवादी पार्टीने शिवसेनेचे टेन्शन वाढवले, मुख्यमंत्र्यांना ‘सपा’ने विचारले ‘हे’ तीन महत्वाचे प्रश्न

मुंबई | गेल्या अडीच वर्षात तुम्ही मुस्लिमांसाठी काय केले?, असा सवाल समाजवादी पार्टीने पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या सूचनेनंतर समाजवादी पार्टीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामुळे आता राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टीने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. सामाजवादी पार्टीचे दोन आमदार विधानसभेवर आहे.

समाजवादी पार्टीने काल पक्षाकडून जे मागणी करण्यात आला. यात सपाने पक्षा अंतर्गत मागण्या आणि पक्षासाठी मागण्या होत्या. परंतु,  समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या आदेशानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. आणि या पत्राचे उत्तर जोपर्यंत येत नाही. तोपर्यंत सपा निर्णय कळवणार नाही. महाविकास आघाडीने सर्व आमदारांची आज (7 जून) सायंकाळी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहील.  समाजवादी पार्टीने लिहिलेल्या पत्रकार मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न केले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित उतर मिळाल्यानंतर साप निर्णय घेईल, अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
या प्रश्ना समाजवादी पार्टीने तीन महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. 
आपण सर्वांसाठी म्हणजे सेक्युलर सरकार बनविले होते. महाविकासआघाडीकडून तीन प्रश्नांची उत्तरे आणि भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, असे समाजवादी पार्टीने पत्रात म्हटले आहे.
Exit mobile version