Site icon HW News Marathi

मनसेचा गटाध्यक्षांचा मेळावा; राज ठाकरे सभेत काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या सभे राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई मनसेचा आज (27 नोव्हेंबर) मेळाव्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

यासभेत राज ठाकरे हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह विधान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा हर हर महादेव सिनेमाला असलेला विरोध, राहुल गांधींनी भारतो जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकरसंदर्भात केलेले वक्तव्य आदी मुद्यांवर ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार असताना राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये शेवटची सभा घेतली होती. यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या युतीचे सरकार आले आहे. यानंतर राज्यात अनेक राजकीय उलथापालथ सुरू झाल्या आहेत. यामुळे राज ठाकरे आज सभेत काय बोलणार आणि राज्यात याचे काय पडसाद पडणार हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. 

यापूर्वी राज ठाकरे हे आठ दिवस कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. यासंदर्भात मनसे अधिकृतने ट्विट करत माहिती दिली आहे. राज ठाकरेंचा हा दौरा 29 नोव्हेंबरला सुरू होणार असून 6 डिसेंबरपर्यंत राज ठाकरेंचा दौरा असणार आहे. दरम्यान, राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करत माहिती देण्यात आली आहे. यानुसार राज ठाकरे २९ नोव्हेंबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. हा दौरा ६ डिसेंबरपर्यंत चालेल.

Exit mobile version