Site icon HW News Marathi

महाराष्ट्रातील सत्तांतर घटनापीठाकडे वर्ग; 25 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

मुंबई | राज्यातील सत्तांतर आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले. राज्यातील सत्तांतर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court ) 5 सदस्यांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावर दावा केला होता. या प्रकरणाची याचिका न्यायालयात केली होती. यावर आज होणार सुनावणी न्यायालयाने दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान,  या प्रकरणी न्यायालयाने आजच्या (23 ऑगस्ट) कामात सप्लिमेंट्री लिस्टमध्ये  समाविष्ट केला नव्हता. परंतु, राज्यातील सत्तांतर प्रकरणाचा काल (22 ऑगस्ट) रात्रीपर्यंत न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये समावेश केला नव्हता. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आज होणार की पुन्हा एकदा लांबणीवर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे राज्यातील सत्तांतर सप्लिमेंट्री लिस्टमध्ये समावेश करण्याची विनंती केली होती. यानंतर न्यायालयात सत्तांतरावर सुनावणी घेण्यात आली.

   कपिल सिब्बल यांनी न्यायालयात प्रभावी मुद्दे मांडले – सुभाष देसाई

“शिंदे गटाने विधानसभेचे अध्यक्ष अपात्रतेबाबती निर्णय घेतील, अशी मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने शिंदे गटाची मागणी फेटाळून लावली, अशी माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी न्यायालयाच्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले. सुभाष देसाई पुढे म्हणाले, “शिवसेनेतून फुटून बाहेर गेलेल्या गद्दारांच्या शिंदे गटाने दावा केला होता की, विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घेऊ द्या. परंतु, कपिल सिब्बल यांनी आमच्या बाजूने प्रभावी मुद्दे मांडल्यानंतर यावर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. ”

 

 

Exit mobile version