Site icon HW News Marathi

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच कायम; 1 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ही 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांनी वेगवेगळ्या याचिका न्यायालयात दाखल केल्या होत्या. या याचिकेवर आज (20 जुलै) सुनावणी पार पडली. परंतु, आज पार पडलेल्या सुनावणीत कोणताही निकाल आणि निर्देश न्यायालयाने दिलेले नाही.  या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 1 ऑगस्टला होणार आहे. यापूर्वी दोन्ही बाजूंना मंगळवार (27 जुलै) पर्यत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश न्यायालयाने दिलेले आहे. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देईल, यासाठी 1 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

शिंदे सरकारला 11 दिवसांचा कालावधी मिळाला असून या काळात रखडलेला शपथ विधी देखील मार्गी लागू शकतो. शिवसेना आणि शिंदे गटाने दोघांनी आपली बाजू लिखित स्वरूपात 27 जुलैपर्यंत मांडावी. आणि गरज भासल्यास तर हे संपूर्ण प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करू, असे न्यायालयाने म्हटले आहे.  राज्याची स्थिती जैसे थे तैसे ठेवण्याची मागणी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना मांडले. परंतु, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा सिब्बल यांची मागणी तुर्तास मान्य केलेली नाही. विधानसभा अध्यक्षांना या कारवाईचे सर्व कागदपत्र सुक्षित ठेवण्याचे आदेश दिल्याचे न्यायाधीशानी सांगितले.

संबंधित बातम्या

शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर आज एकत्र सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

 

 

 

 

Exit mobile version