Site icon HW News Marathi

विधान परिषद निवडणुकीत खबरदारी म्हणून सर्व पक्षांचे आमदार पंचतारांकित हॉटेल मुक्कामी

मुंबई | राज्याचे राजकारण विधान परिषद निवडणुकीमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपने पक्षांनी खबरदारी म्हणून त्यांच्या  आमदारांना वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक आहे. यामुळे राज्यातील सर्व राजकारण हे हॉटेलच्या अवतीभवती फिरत आहेत. या हॉटेलमध्ये प्रत्येक पक्ष त्यांच्या आमदारांसोबत बैठक सुरू आहेत. विधान परिषद निवडणूक सोमवार (20 जून) होणार आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीचा पराभव होणार की विजय होणार किंवा भाजपचा पराभव की विजय याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

काँग्रेसचे आमदार फोर सिजन हॉटेल, शिवसेनेच आमदार हॉटेल वेस्ट इन, भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  ट्रायडेंटमध्ये आहेत. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यांच्या आमदारांना राज्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. नुकतेच राज्यात राज्यसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने त्यांच्या नेत्यांना ट्रायडेंट हॉटेलमध्ये ठेवले होते. तरी देखील महाविकास आघाडीचा राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत देखील पराभवाचा सामना करावा लागू नये. म्हणून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी त्यांच्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. यामुळे आता पुढील 24 तासत तिन्ही पक्ष आप आपल्या आमदारांसोबत बैठका घेणार असून त्यांना विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

विधान परिधद निवडणुकीत 10 जागेसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला हा विधान परिषदे घेणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. “विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला होता. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, “नाना पटोले जी काँग्रेस एक जागा हरल्यानंतर त्याची जी कारणे सांगावी लागत आहेत.  त्या कारणाची स्क्रिप्ट आताच तयार करत आहेत. अशा प्रकरणे त्यांनी जी एक बोगस स्क्रिप्ट तयार केलेली आहे.”

 

Exit mobile version