Site icon HW News Marathi

‘मविआ’च्या महामोर्चात शरद पवार सहभागी; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई | महाविकास आघाडीचा महापुरुषांच्या अवमान करणाऱ्याविरोधात महामोर्चा सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी झाले आहेत. यापूर्वी शरद पवार यांच्या प्रकृतीमुळे मोर्चा सहभागी होण्यावर संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, शरद पवार मोर्चातील सभेत सहभागी झाले आहेत. शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

महाविकास आघाडीच्या महामोर्चा टाईम्स ऑफ इंडियाजवळ पोहोचल्यानंतर आयोजित केलेल्या सभेत शरद पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. हा मोर्चा रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडिया कार्यलयापर्यंत आयोजित केला आहे. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले आहेत. तर ठाकरे गटाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा नेता आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अन्य नेते सहभागी झाले आहेत. तर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप होणार आहेत.

 

 

Exit mobile version