Site icon HW News Marathi

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या दृष्टीने ‘मविआ’ निर्णय घेणार?

मुंबई | नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) निवडणुकीच्या दृष्टीने रणनिती ठरविण्यासाठी शिवसेनेची बैठकीचे आयोजन केले आहे. नाशिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज (14 डिसेंबर) दुपारी 12 वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे. या बैठकीत शिवसेना कोणाला पाठिंबा द्यायचा यावर चर्चा होणार असून यानंतर महाविकास आघाडी एकत्र निर्णय घेणार असल्याची माहितीही संजय राऊतांनी दिली आहे.

दरम्यान, डॉ. सुंधीर तांबे यांना काँग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार दिली होती. डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाकडून एबी फॉर्म देखील आला होता. परंतु, डॉ. सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा फॉर्म भरला. तांबेंच्या या कृतीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यामुळे आता नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.

 

Exit mobile version