HW Marathi
देश / विदेश राजकारण

अंतराळात भारताचे सर्जिकल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’ला मोठे यश

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित केले आहे. अंतराळात  भारताने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चौथ्या स्थानी भारताचा तिरंगा फडकविला आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश आले आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. मोदींने डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. भारताकडून अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी मोदी म्हणाले.

लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय ?

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १६० किमी ते २००० किमी अंतरापर्यंत कक्षा म्हणजे लो अर्थ ऑर्बिट होय. १६० किमीपासून २००० किमी अंतरापर्यंतच्या या कक्षेतच सर्वाधिक संख्येने उपग्रह आहेत. या कक्षेत नकाशे, खनिजांचे मापन, लोकसंख्या, जंगल, शेती यांचे मापन आणि नियोजन करणाऱ्या उपग्रहांची दाटी आहे. विज्ञानासाठी वापरले जाणारे सर्व उपग्रह देखील याच कक्षेत फिरत असतात.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

 

  • अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारताचा चौथ्या स्थानी झेंडा फडकविला आहे
  • भारताने आज (२७ मार्च) अंतरिक्ष महाशक्ती बनला आहे
  • मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रह पाडण्यात यश, या अभियानाच्या यशस्वीतेमुळे भारत अंतराळात महाशक्ती बनला आहे.
  • भारताने मिसाईलच्या द्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले
  • भारताने फक्त ३ मिनिटांत उपग्रह पाडला
  • डीआरडीओच्या शास्त्रज्ञांकडून लक्ष साध्य करण्यात यश आले
  • ३०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश
  • भारताकडून अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी

Related posts

न्यायालयाच्या चपलेने राफेल आरोपाचा विंचू मारण्याचा प्रयत्न होतोय !

News Desk

#IrrigationScam : चौकशीला सहकार्य करणार, माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास !

News Desk

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

News Desk