HW News Marathi
राजकारण

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण | साध्वी प्रज्ञा आज सुनावणीला हजर राहणार

नवी दिल्ली | भोपाळच्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने नुकतेच ७ जूनच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज (७ जून) होणाऱ्या सुनावणीला हजर राहणार आहेत. खरंतर, तब्येतीच्या कारणास्तव साध्वी प्रज्ञा सुनावणीला उपस्थित राहू शकणार नाहीत असे गुरुवारी (६ मे) म्हटले जात होते. मात्र, साध्वी प्रज्ञा या नुकत्याच भोपाळमधून मुंबईसाठी रवाना झाल्या असून त्या सुनावणीसाठी मुंबई न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती मिळत आहे.

संसदेच्या काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ३ ते ७ जूनपर्यंत न्यायालयात गैरहजर राहण्याच्या परवानगीसाठी साध्वी प्रज्ञा यांनी केलेला अर्ज ३ जून रोजी एनआयए न्यायालयाने फेटाळला होता. मात्र, गुरुवारी साध्वी प्रज्ञा यांची तब्येत बिघडली. साध्वी प्रज्ञा यांच्या आतड्याला संक्रमण झाल्याने कंबरदुखी आणि उच्च रक्तदाब वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे, साध्वी प्रज्ञा यांना एक किंवा दोन दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार होते. असे असताना साध्वी आज होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहणार नाहीत, अशीही चर्चा होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येनंतर ठाकरेंची पंढरीची वारी

News Desk

गोव्यात काँग्रेसला मोठी गळती! 11 पैकी 10 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता

Aprna

शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?

News Desk