HW Marathi
देश / विदेश राजकारण

ममता बॅनर्जी झाशीची राणी नाही तर पुतना मावशी !

नवी दिल्ली | “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या झाशीच्या नावावर कलंक आहे. परंतु ममता या झाशीची राणी होऊ शकत नाही तर त्या पुतना मावशी किंवा किम जोंग उन होऊ शकतात,” असे वादग्रस्त विधान भाजप नेता आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह केले आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर त्यांना समर्थकांकडून आधुनिक काळातील झाशीची राणी संबोधले जात आहे.  ममता बॅनर्जी या नवीन पिढीला झाशीची राणी वाटत आहे. यावरू गिरिराज यांनी ममतावर निशाणा साधला.

पुढे गिरिराज बोलताना म्हणाले की,  “रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांना समर्थन देणारी आणि भारताला तोडण्याची भाषा करणाऱ्या झाशीची राणी आणि पद्मावती असू शकत नाहीत.” दरम्यान, गिरिराज यांच्या या वक्तव्यांवरून वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही अशाच वादग्रस्त वक्तव्यांनी केंद्रीय मंत्री चर्चेत आले होते.

 

 

 

 

Related posts

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अधिक कठीण

News Desk

नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला !

News Desk

मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?

अपर्णा गोतपागर