HW News Marathi
राजकारण

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यावर भडकल्या ममता दीदी

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यावर भडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ममतांचा ताफा जात असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर ममता दीदी भडकल्याचा व्हिडीओ पश्चिम बंगालच्या भाजपने त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

भाजपने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी दीदी इतक्या नाराज का आणि या घोषणांना शिव्या का म्हणतात, असे कॅप्शनही देण्यात आले आहे. मात्र हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपा या व्हिडिओद्वारे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबतचे एक ट्वीटही त्यांनी केले आहे.

पश्चिम बंगालमधील चंद्रकोण येथील आरामबाग येथील उमेदवाराच्या प्रचारार्थ एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या होत्या. घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या. ममतांनी या कार्यकर्त्यांवर शिव्या देत असल्याचा आरोप केला आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा सांगितला ‘तो’ गंमतीदार किस्सा

Aprna

कुणाकडे किती खोके पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण; आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला टोला

Chetan Kirdat

अमेठीतून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk