HW News Marathi
राजकारण

ममताजी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत !

नवी दिल्ली | “ममताजी, तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तुम्हाला यापुढेही त्यांच्याशीच चर्चा करावी लागणार आहे”, असे म्हणत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत त्यांच्या वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ममता यांनी सातत्याने पंतप्रधान मोदींसह भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी मौन सोडले आहे. “तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तुम्ही तुमच्या सर्व मर्यादा तोडल्या आहेत. मात्र, तुम्ही एक लक्षात घ्यायला हवे कि पुढे देखील तुम्हाला पंतप्रधान मोदींशीच चर्चा करायची आहे”, असे सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ”दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों” असे म्हणत सुषमा स्वराज यांनी ममता बॅनर्जींना टोला देखील लगावला आहे.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर कठोर शब्दात टीका केली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये फनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ममता बॅनर्जी यांच्या समवेत आढावा बैठक घेऊ इच्छित होते. मात्र, ‘‘मी मोदींना देशाचा पंतप्रधान मानत नाही, त्यामुळे मी त्यांच्या कोणत्या बैठकीत सहभागी झाले नाही. मी त्यांच्यासोबत एका मंचावरही उपस्थित राहू इच्छित नाही. मी येणाऱ्या पंतप्रधानांशी वादाळासंदर्भात चर्चा करेन. वादळामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. निवडणुकीपूर्वी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नाही,’’ असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार

News Desk

विधानसभा अध्यक्षांनी ऋतुजा रमेश लटकेंना दिली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Aprna

मुख्यमंत्र्यांना दादाची ट्यूशन लावावी लागेल- राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मुख्यमंत्र्यावर हल्ला

swarit