HW News Marathi
राजकारण

स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये मराठीला वगळले

मुंबई । गुजरातमधील नर्मदा नदीवर साकारण्यात आलेला ५५0 फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा म्हणजे त्यांच्या कामाचा सर्वोच्च बिंदू आहे. पुतळ्याच्या खाली १० भाषांमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी हे नाव लिहिण्यात आले आहे. परंतु त्यात तमिळ व उर्दू भाषेमध्ये चुका आहेत तर, मराठी भाषेला पूर्ण वगळण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली. ते म्हणजे राम सुतार.

ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) असे या पुतळ्याचे वर्णन मोदी यांनी करताना शिवरायांशी तुलना केली. केवडीया येथे नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी भाषणावेळी शिवरायांचा उल्लेख करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये शिवरायांचे शौर्य होते, असा उल्लेख केला आहे. या नावाच्या पाटीमध्ये हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ गुजरातीसह रशियन, फ्रेंच आणि चीन अशा इतर देशांच्या भाषांचाही समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्लामपूर चे मैदान मोबाईल बॅटरीच्या उजेडाने उजळून निघाले

swarit

“दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा”, संजय राऊतांची राज्य सरकारवर बोचरी टीका

Aprna

थरुर यांना मोदींविरोधात केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जातमुचलक्यावर जामीन मंजूर

News Desk