HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

अमरावती शिवसेनेत वाद, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली बैठक

मुंबई | शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी गद्दारीमुळेच अमरावती लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. अभिजीत अडसूळ यांनी ही तक्रार केली आहे. “अनंतराव गुढे यांच्या पत्नीने नवनीत कौर राणा यांच्या विजय आणि आभार रॅलीत सहभागी होत नवनीत राणा यांचा सत्कार केला होता. याचे सगळे व्हिडिओ आणि फोटो उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी (१४ जुलै) मातोश्रीवर अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

माढ्यातील ओपनिंग बॅट्समन आता संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहे !

News Desk

आजचा सुजाण बालक उद्याचा आदर्श नागरिक | अशोक बनकर

News Desk

पुण्याच्या पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग

News Desk