HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘रिट्रीट’मध्ये आमदारांची बैठक

मुंबई | युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यानंतर आज (१० नोव्हेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये आपल्या आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी गेले आहेत. शनिवारी (९ नोव्हेंबर) आदित्य ठाकरे यांनी रिट्रीट हॉटेलमध्ये जाऊन आपल्या आमदारांची भेट घेतली, चर्चा केली. त्यानंतर ते तिथेच मुक्कामाला देखील राहिले. त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे देखील हॉटेल रिट्रीटमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्व आमदारांची बैठक पार पडणार आहे. राज्यपालांकडून भाजपला दिल्या गेलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाचा पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे, या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक सुरु असताना दुसरीकडे ‘वर्षा’वर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. भाजपच्या या बैठकीत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन इत्यादी नेते उपस्थित होते. राज्यपालांकडून भाजपला दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणावर चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आता पुन्हा भाजपच्या कोअर कमिटीची आणखी एक बैठक संध्या ४ वाजता पार पडेल. या बैठकीनंतर भाजप सत्तास्थापनेसंदर्भातील आपला निर्णय स्पष्ट करेल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही”, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका

Aprna

राज्यातील हे ‘स्थगिती सरकार’ फार काळ टिकणार नाही !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६९वा वाढदिवसानिमित्त गुजरात दौरा

News Desk