Site icon HW News Marathi

अण्णासाहेब मायकर व्हायरल ऑडिओ क्लीपवर विनायक मेटेंच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे दोन दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला होता. परंतु, विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंर अनेक शंका उपस्थित केला जाऊ लागल्या. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी वेगवेगळी पथके तपास करत आहेत. आता विनायक मेटेंच्या निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर अपघातबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. या मायकरांचा ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपनुसार,  मधून 3 ऑगस्ट रोजी देखील मेटेंच्या गाडीला अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला. गेल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात विनायक मेटे  यांची पत्नी ज्योती मेटे (jyoti mete) यांनी स्वतः मायकर यांच्याशी संवाद साधला आहे.

 

ज्योती मेटेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, “मी आताच व्हायरल होत असलेली ओडिओ क्लिप ऐकली असून अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझे बोलणे झाले असून त्यांचे म्हणाले की, समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी, अशा पद्धतीने ती गाडी ओव्हरटेक करण्यात आली होती. ही बाब खरत आक्षेपार्ह्य होती. यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही झाली पाहिजे. 3 ऑगस्ट रोजी असाच प्रकार घडल्याचे अण्णासाहेबांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे.” ज्योती मेटे पुढे म्हणाल्या, “मला सुद्धा यात संशय वाटत आहे. मेटेंचा अपघात झालेली गाडी आणि तीन तारखेला वापरलेली गाडी यांची चौकशी झाली पाहिजे.”

 

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले

अण्णासाहेब मायकर म्हणाले, “तीन ऑगस्टला पुण्याजवळ दोन गाड्यांनी विनायक मेटेंच्या गाडीचा 2 किलो मीटरपर्यंत पाठलाग केला होता. यात अर्टिगा कार आणि दुसरी आयशर होती. मी मेटेंना म्हणाले की, थांबून बघू. परंतु, मेटे म्हणाले, जाऊ दे, आम्ही दोघेही बैठकीसाठी बीडहून येत होतो. आमच्या गाडीपुढे आयशर होते. मागून एक अर्टिगा कार कट मारत होते. यात तीन-चार लोक बसले होते. मेटेंची गाडी समाधान वाघमोडे (चालकचे नाव) गाडी चालवित होते. हा संपूर्ण प्रकार तीन ऑगस्टला पुण्याजवळ शिक्रापूर येथे घडला होता.

 

Exit mobile version