Site icon HW News Marathi

मिलिंद नार्वेकरांनी दसरा मेळाव्याच्या कामाची केली पाहाणी; शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम

मुंबई | शिवसेनेचा बहुचिर्चित दसरा मेळाव्याची (Dussehra Melava) जोरदार तयारी सुरू आहे. सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कावर होणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी अवघ्ये दोन दिवस शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर काल (2 ऑक्टोबर) उद्धव ठाकरेंचे सहाय्यक आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी शिवाजी पार्कमध्ये जाऊन कामाची पाहाणी केली. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीच्या मैदानात दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

नार्वेकर हे शिंदे गटात जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळता रंगल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला नार्वेकरांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी करताना दिसत आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची पाहाणी करताना नार्वेकरांनी दुर्गोत्सवा भेट दिली आणि माँ दुर्गेचे दर्शन घेतले. नार्वेकरांनी काल रात्री शिवाजी पार्कमध्ये जाऊन शिवसेनेच्या दसरा मेळव्याची पाहाणी केली. यासंदर्भात नार्वेकरांनी ट्वीट करत माहिती दिली. नार्वेकरांनी ट्वीटमध्ये म्हटले, “५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले.”

दरम्यान, शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर घेण्याची प्रथा सुरू झाली. शिंदेंनी शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर भाजपसोबत हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे गट वेगळा झाल्यापासून त्यांनी शिवसेनेवर दावा केला. यानंतर शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाणी यांच्यावर दावा केला. हे प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगावर निर्णय देणार आहे. तर शिंदे गटाने दसरा मेळाव्यावर देखील आपला दावा केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाने शिंदे गटाची शिवाजी पार्कवर  दसरा मेळाव्याची मागणी फेटाळून लावली. तर शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परावनगी दिली.

 

 

Exit mobile version