HW News Marathi
राजकारण

“पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर माझा मंत्रिमंडळात समावेश”, संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी माझ्यावर झालेल्या आरोपमध्ये पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर मी नव्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे सरकारचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली आहे. राठोड यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात (Cabinet Expansion) स्थान मिळाले आहे. राठोडांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे सरकारवर भाजपच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राठोडांना ‘मंत्रीपद देणे हे दुर्दैवी आहे,’ अशी टीका व्हिडिओ ट्वीट करत केली आहे. यानंतर आज (10 ऑगस्ट) शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंत राठोडांनी पहिल्यांदा माध्यमांशी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.

संजय राठोड म्हणाले, “माझ्यावर झालेल्या आरोपमध्ये पोलिसांनी क्लीन चिट केले आहे. यानंतर मी नव्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मलाही माझा परिवार आहे. मी गेली अनेक वर्ष राजकारणात आहे. या प्रकरणातील सगळ्या गोष्टींची माहिती चित्रा वाघ यांना नाही. त्यामुळे इथून पुढे माझ्यावर आरोप केले तर मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे. फडणवीसांनी सांगितल्यानंतरच मी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.”

 

चित्र वाघ नेमक्या काय म्हणाल्या

भाजपच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राठोडांना मंत्रीपद देणे हे दुर्दैवी आहे, अशी टीका व्हिडिओ ट्वीट करत केली आहे. राठोडांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ताबडतोप व्हिटीओ ट्वीटरवर त्यांच्यावर टीका केली आहे. चित्र वाघ म्हणाल्या, “महाराष्ट्रातील आपली बंगिनी पुजा चव्हाण हीच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केलेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असता आहे. संजय राठोड मंत्री जरी झाला असेल तरी त्यांच्याविरुद्धचा माझा लढा…हा मी सुरुच ठेवणार आहे. न्याय देवतेवर माझा पूर्णविश्वास आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात ‘लढेंगे भी और जितेंगे भी’,” असे व्हिडीओतून राठोडांवर टीका केली.

संबंधित बातम्या

“संजय राठोड यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केलेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी”, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Related posts

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत ?

News Desk

विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कार कसा घडेल हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच ना! – अजित पवार

Aprna

भाजप-सेनेची युती हा केवळ सत्तेसाठीचा स्वार्थ !

News Desk