Site icon HW News Marathi

मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा राजकीय परिचय

मुंबई |  शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री आज (9 ऑगस्ट) शपथ घेतली आहे.  शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज (9 ऑगस्ट) मुंबईतील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधीची सोहळा पार पडला. शिंदे गटाचे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा राजकीय परिचय जाणून घेऊ या.

अब्दुल सत्तार यांचा जन्म 1 जानेवारी, 1965 रोजी औरंगाबाद येथील सिल्लोडमध्ये झाला आहे. सत्तारांनी बी. ए. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. सत्तार यांच्या पत्नीचे नाव नफीजा बेगम असे आहे. सत्तारांना 7 अपत्ये असून यात दोन मुलगे व पाच मुली आहेत. सत्तार हे व्यवसायाने व्यापारी आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत औरंगबाद जिल्ह्यातील 104 सिल्लोड मतदारसंघातील आमदार आहेत.

अब्दुल सत्तार यांचा अल्प परिचय

अध्यक्ष, नॅशनल एज्युकेशन संस्था; अध्यक्ष, प्रगती शिक्षण संस्था; अध्यक्ष, प्रियदर्शनी क्रीडा मंडळ, सिल्लोड; सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमांचे आयोजन; रक्तदान शिबीरांचे आयोजन, आदिवासी व दलित समाजातील सामुहिक विवाहांचे आयोजन; किल्लारी,
जिल्हा लातूर येथील व गुजरात राज्यातील भूज येथील भूकंपग्रस्तांना मदत कार्य; मोहाडी पूरग्रस्तांना मदत; १९८४ ते १९९० सदस्य, ग्रामपंचायत, सिल्लोड; ५ मार्च, १९९४ ते ९ जानेवारी, १९९६, २९ ऑगस्ट, १९९८ ते ४ मार्च, १९९९ व १५ फेब्रुवारी, २००० ते ६ सप्टेंबर, २००१, अध्यक्ष, नगरपरिषद, सिल्लोड; चेअरमन, विविध कार्य सेवा सोसायटी, सिल्लोड; संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिल्लोड; संचालक, म्हसोबा महाराज तेलबिया उत्पादक सहकारी संस्था संचालक, दूध उत्पादक सहकारी संस्था, सिल्लोड; संचालक, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; २००१-२००६ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, २ नोव्हेंबर, २००९ ते डिसेंबर, २०१० अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री, २ जून, २०१४ ते ऑक्टोबर, २०१४ पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री, मे, २०१९ पासून शिवसेना पक्षाचे कार्य, ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, जानेवारी, २०२० ते जून २०२२ महसूल, ग्रामविकास, बंदरे, खारजमिनी विकास व विशेष सहाय्य खात्याचे राज्य मंत्री आज (9 ऑगस्ट) मंत्रीपदाची शपथ.

Exit mobile version