HW News Marathi
राजकारण

डिवचायचा प्रयत्न होणार पण तुम्ही शांत रहा !

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २२ ऑगस्टला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ २२ ऑगस्टला ईडीच्या कार्यालयाबाहेर शांतपणे थांबणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे म्हटले की, “येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचायचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.”

राज ठाकरे पुढे असे देखील म्हणाले की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू.” “इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे. म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा.”

तसेच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये, असे आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

राहुल गांधी भाजप नेत्यांपेक्षाही जास्त वेळा मोदींचे नाव घेतात !

News Desk

अयोध्या राम मंदिराच्या सुनावणीची तारीख जानेवारीतच निश्चित होणार !

News Desk