HW News Marathi
राजकारण

मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ ईडीच्या कार्यालयाबाहेर थांबणार

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी २२ ऑगस्टला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजवली असून २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ईडीच्या नोटीस विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा बंदचा इशारा दिला होता. परंतु राज ठाकरेंनी बंद करून नका, असे आवाहन त्यांनी केले.

राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ ईडीच्या कार्यालयाबाहेर शांतपणे उपस्थित राहणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे. कोहिनूर प्रकरणातील आज (२० ऑगस्ट) राज ठाकरे यांचे भागीदार आणि निकटवर्तीय राजन शिरोडकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्यासोबत उन्मेष जोशी देखील आहेत. या दोघांची एकत्र चौकशी केली जात आहे.

“आम्ही सर्व शांततेच्या मार्गाने ईडीच्या कार्यालयाकडे जाऊ. पक्षाची भूमिका असल्याने कार्यकर्ते आक्रमक होणार नाहीत आणि पक्षाच्या आदेशाच्या बाहेर जाणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनीही आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन नांदगावकर यांनी केले. सत्ताधारी पक्षातील काही जण आपल्यामध्ये सहभागी होऊन गोंधळ घालून आपल्याला बदनाम करु शकतात. त्यामुळे त्याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे, “असेही बाळा नांदगावकरांनी सूचना दिल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल !

News Desk

INX Media Case: पी. चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगामध्ये नाही

News Desk

इथून पुढे जातीय दंगलीत वाढ होणार – राज ठाकरे

News Desk