HW News Marathi
राजकारण

…यांच्या यादीत माझे नाव घेऊ नका, मी बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो! – राज ठाकरे

मुंबई | “माझे बंड भुजबळ, राणे आणि शिंदेंच्या बंडाच्या यादीत घेऊ नका, मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो होतो” , असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितले. राज ठाकरेंनी आज (23 ऑगस्ट) मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात त्यांनी शिवसेनेसोबत बंड केलेल्या नेत्यांच्या यादीत त्यांचे देखील नाव घेतले जाते. यावरून राज ठाकरेंनी आक्षेप घेत स्पष्टपणे सांगितले की, “मी बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो.” यावेळी राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गट यांनी पक्षासोबत बंडखोरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी मुद्यांवरुन भाषणातून तोफ डागली.

राज ठाकरे म्हणाले, “माझे बंड भुजबळ, राणए आणि शिंदेंच्या बंडाच्या यादीत घेऊ नका. हे सर्व जण एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. परंतु, मी बाळासाहेब ठाकरेंना भेटून, त्यांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की, जेव्हा बाळासाहेबांना कळले की, राज ठाकरे आता पक्षात राहणार नाही. ती माझी बाळासाहेबांशी शेवटची भेट होती.”

राज ठाकरेंनी शिंदेंच्या बंडखोरीसंदर्भात पहिल्यांदा मेळाव्यात बोलताना म्हणाले, “गेल्या दोन-अडीच वर्षात महाराष्ट्रात जे काय सुरू होते. ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही. याआधी महाराष्ट्रात असे कधी झाले नव्हते. ज्या मतदारांनी 2019 मध्ये मतदान केले. त्या मतदारांना कळत ही नसेल की आपण नक्की कुणाला मतदान केले?, आता कोण कुणामध्ये मिसळले आणि कोण कोणत्या पक्षातून बाहेर आले हेच कळत नाही. हेच खरे राजकाण आहे, असे तुम्हाला वाटत असेल. पण हे खरे राजकारण नाही. तरही सत्तेची तात्पुरती आर्थिक तडजोड आहे.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरे ‘लक्ष्मण किला’ येथे पोहोचले

News Desk

#LokSabhaElections2019 : शिवसेनेपुढे जालन्यानंतर आता उस्मानाबादचा तिढा

News Desk