Site icon HW News Marathi

“राज्यापाल पदावर बसलात म्हणून मान राखतोय नाही तर…”, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई | “तुम्ही राज्यापाल पदावर बसलात म्हणून मान राखतील. नाही तर, महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना  दिला आहे.. राज ठाकरेंनी आज (27 नोव्हेंबर) मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंनी राज्यपाला, राहुल गांधींनी भारतो जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकरसंदर्भात केलेले वक्तव्य, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी मुद्यांवर तोफ डागली.

राज्यातील उद्योग बाहेर जात आहे, यासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, “आपले वय काय आपण बोलताय काय? तुम्ही राज्यापाल पदावर बसलात म्हणून मान राखतील. नाही तर, महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. महिन्याभरापूर्वी राज्यापालांनी गुजराती-मारवाडी परत गेले तर काय होईल, असा सवाल त्यांनी केला आहे. यासंदर्भात राज ठाकरे पुढे म्हणाले, “तुम्ही तुमचे राज्य सोडून महाराष्ट्र का आला?, तुम्ही जर उद्योग आणि व्यापार तुमच्या राज्यात का नाही थाटले. याचे कारण, त्यांच्या राज्यात महाराष्ट्रासारख्या सुपीक जमीन नाही. कोश्यारींकडून महाराष्ट्र समजून घेण्याची मराठी माणसाला गरज नाही.”

राज्याच्या वातावरणात अजूनही निवडणुका दिसत नाहीत

राज्यात निवडणुकासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, “अजूनही वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडणुका अशी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात सध्या खेळ खंडोबा सुरू असून इतर पक्षांपेक्षा आपल्या आंदोलनाला सर्वात जास्त यश आलेले आहे. महाराष्ट्राचा सर्व बाजूंनी खोळंबा झालाय. मनसेच्या ‘टोल’ आंदोलनानंतर ६५ ते ६७ टोल नाके बंद झाले. परंतु, मनसेची आंदोलने विस्मरणात जातील यासाठी यंत्रणा एका बाजुला सुरू होती. काही जणांकडून अशी यंत्रणा राबवली जाते. आंदोलने करुनही यशस्वी करुनही प्रश्न फक्त मनसेलाच का विचारतात, असा सवाल राज ठाकरेंनी माध्यमांना विचारले. इतर पक्षांना प्रश्न कुणीही विचारत नाहीत. टोलबाबत कुणीही विचारणा करत नाहीत. राज्यात नोकऱ्यांबाबत कुठेही जाहिराती नसतातठ,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. येत्या मनसेच्या आंदोलनाची पुस्तिका काढणार, असेही राज ठाकरेंनी आवर्जून यावेळी सांगितले.

Exit mobile version