Site icon HW News Marathi

“…आपण उगाच टाहो फोडतो”, उद्योगासंदर्भात राज ठाकरेंचे मोठे विधान

मुंबई | “एका-दोन उद्योग  बाहेर गेले. तरी महाराष्ट्राचे काही नुकसान होणार नाही”, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधानांना गुजरातला प्राधान्य देणे शोभत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. राज ठाकरेंनी आज (8 जानेवारी) 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान म्हणाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र हा श्रीमंत आहेत. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. सर्वार्थाने पुढे आहेत. आपण उगाच टाहो फोडतो असतो. महाराष्ट्राचे काय होणार आणि मराठीचे काय होणार वैगेरे वैगेरे. आहे दे पण आपण ठिकविले, तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे. एका-दोन उद्योग  बाहेर गेले. तरी महाराष्ट्राचे काही नुकसान होणार नाही. तरीही आम्ही खसखस. मला असे वाटते की, आपण महाराष्ट्र जोपासने गरजेचे आहे. प्रत्येकाने त्या गोष्टीकडे बघने गरजेचे आहे.”

…एका पंतप्रधानाला शोभत नाही

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य हे त्यांच्याकडे समान मुलासारखे असले पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत, म्हणून गुजरातला प्राधान्य देणे हे एका पंतप्रधानाला शोभत नाही”, अशी टीका राज ठाकरेंनी पंतप्रधानांवर केले आहे. राज ठाकरेंच्या विधानांनंतर उपस्थितांनी टाळ्यांचा जगर झाला.

 

 

Exit mobile version