Site icon HW News Marathi

राज ठाकरेंच्या अल्टिमेटनंतर माहिम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर BMC ची कारवाई

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहिम (Mahim) समुद्रातील मजारीभोवतीचे अनधिकृत बांधकामचा मुद्दा मांडला. माहिम दर्ग्याच्या मागे असणाऱ्या वादग्रस्त जागेवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी राज ठाकरेंनी बुधवारी (22 मार्च) भाषणादरम्यान अल्टिमेटम दिले होते. यानंतर  मजारीभोवतीचे अनधिकृत बांधकाम  मुंबई महापालिकेच्या अतिक्रम विरोधी पक्षकाने आज (23 मार्च) सकाळी कारवाई पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर दर्गयाभोवती आणि माहिम किनारा परिसर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

माहिम येथे दर्ग्याच्या मागे मजार आहे. 600 वर्षापूर्वीची ही मजार असल्याचा दावा येथील ट्रस्टने केले आहे. यामुळे मजार न हटवित तिच्या आजूबाजूचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात येत आहे. यासाठी मुंबई महापालिकेचे आज सकाळी 8 वाजता बीएमसीचे अतिक्रम विरोधी पक्षकाने कारवाई पूर्ण केली झाली आहे. राज ठाकरेंनी अल्टिमेटमनंतर अवघ्या 12 तासात बीएमसीने माहिमच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

 

राज ठाकरे नेमके काय म्हणाले

सालाबाद प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढी पाडव्यानिमित्ताने जाहीर सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरेंनी भाषण देताना माहिम समुद्राजवळ मजारीभोवती आजूबाजूला एक दर्गा अनधिकृत बांधण्याचे काम सुरू असल्याचा एक व्हिडिओ दाखविला. राज ठाकरे म्हणाले, “या दर्ग्यावर एका महिन्याच्या आत कारवाई झाली नाही तर त्याच्या बाजूला आपण गणपती मंदिर उभारू”, असा अल्टिमेटम त्यांनी दिला.

 

 

Exit mobile version