Site icon HW News Marathi

मुख्यमंत्र्यांची मनसे कार्यालयाला भेट; पुन्हा मनसे-शिंदे युतीच्या चर्चा

मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गुढी पाडवा (Gudi Padwa) निमित्ताने जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंची सभाही शिवतीर्थावर आज (22 मार्च) सायंकाळी 6 वाजता होणार आहे. त्यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज डोंबिवली येथील मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्या कार्यालयाला भेट दिल्यामुळे पुन्हा एकाद मनसे-शिंदे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात राजू पाटील म्हणाले, “आज पहिल्यांदा गणपती संस्थांच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री जे आपल्या ठाणे जिल्ह्यातील आहेत. आमचे राजकीय मतभेद असतील परंतु, एक संस्कृती पण असते. मी त्यांना विनंती केली. ऑफिस बाजूलाच आहे येता का?, मुख्यमंत्र्यांनी एकाही संकेदाचा वेळ न घालविता. आमच्या विनंतीला मान देऊन आले. यामुळे मी त्यांचे आभारी आहे. 24 तास बाराही महिने कोणीही राजकारण करत नाही. काही गोष्टी आपल्या संस्कृतीच्याही असतात. आणि सामाजिक सलोख्याचे पण असतात. त्याला अनुसरून आपले मुख्यमंत्री आलेत. मनने जुळली किंवा मते जुळली. हे सगळे आमचे राजसाहेब बघतील. हा काही आमचा विषय नाही. आताची परिस्थिती बघता. युती आघाडी हा आमच्या कार्यकर्त्यांचा विषय नाही. तो राजसाहेबांचा विषय आहे.”

राज ठाकरे हे आजच्या सभेत राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थिती काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे. मनसेच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक टीझर देखील जारी करण्यात आला होता. मनसेचा 40 सेंकदाचा टिझरमध्ये सुरुवातीलाच विधानभवनाचा फोटो आणि राज ठाकरेंच्या आवाजात एक ऑडिओ सुरू आहे. गेल्या दोन अडीत वर्षे महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे. ही चांगली गोष्ट नाही बरे का…महाराष्ट्रासाठी असे महाराष्ट्रात कधी नव्हते. हेच खरे राजकारणे आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर हे राजकारण नव्हे!”  “महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी… चला शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, २२ मार्च २०२३ सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई”

संबंधित बातम्या

गुढीपाडवा निमित्ताने राज ठाकरेंची सभा; सेनाभवना समोरील बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

Exit mobile version