HW Marathi
देश / विदेश राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आसाममध्ये गोमांस विक्रीच्या संशयातून जमावाकडून एका मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेल्या असताना देशात एक संतापजनक घटना घडली आहे. गोमांस विक्रीच्या केवळ संशयातून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली आहे. केवळ मारहाणच नव्हे तर जमावाने या व्यक्तीने डुकराचे मांस देखील खायला लावले आहे. शौकत अली (६८) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आसामच्या बिश्वनाथ चारीअली येथे रविवारी (७ एप्रिल) ही धक्कादायक घटना घडली आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शौकत यांच्या आजूबाजूचा जमाव त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारताना दिसत आहे. “तुम्ही गोमांस विक्री करता का ? तुमच्याकडे गोमांस विक्रीचा परवाना आहे का ? तुम्ही बांगलादेशी आहात का ? तुमच्याकडे एनआरसी प्रमाणपत्र आहे का ?”, असे विविध प्रश्न या जमावाकडून विचारले जात आहेत.

शौकत अली हे गेल्या ३५ वर्षांपासून या भागात भोजनालय चालवतात, अशी माहिती येथील स्थानिक पोलिसांनी दिली आहे. शौकत अली हे जबर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यावेळी २ अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे.

Related posts

हनुमानाची जात सांगणे पडणार महागात

News Desk

आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

News Desk

हिमाचलमध्ये प्रेमकुमार धूमल भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार 

News Desk