HW News Marathi
राजकारण

अजब खुलासा…मोदींकडे एकही दुचाकी अथवा चारचाकी वाहन नाही !

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला आहे.पंतप्रधानांच्या मालमत्तेचा तपशील सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केला असून हा तपशील सर्वसामान्यांसह भारतीयांना धक्का देणारा आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडे एकूण २.२८ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सध्या त्यांच्याकडे ४८ हजार ९४४ रुपये एवढी रोख रक्कम आहे. मोदींकडे एकही दुचाकी अथवा चारचाकी वाहन नाही. सुरक्षित बचत योजनांमध्ये त्यांनी बचत केली आहे असेही या तपशीलात जाहीर करण्यात आले आहे.

या तपशीलातील अत्यंत लक्षवेधी बाब म्हणजे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींना सोन्याची खरेदी केलेली नाही. त्यांच्याकडे आता प्रत्येकी ४५ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठय़ा आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत ७५ लाख रुपयांची वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

News Desk

#ElectionsResultsWithHW : आमची आघाडी जनतेच्या पसंतीस उतरली नाही !

News Desk

दूध भेसळीच्या मुद्यावर अजित पवार विधानसभेत आक्रमक

Aprna