HW News Marathi
राजकारण

मोदींनी दिला जय अनुसंधानचा नारा

मुंबई | जय जवान जय किसान हा नारा आपण सर्वांनीच ऐकला आहे. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्री यांनी हा नारा दिला होता, त्यानंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विज्ञानाचे महत्व विशद करीत जय जवान जय किसान जय विज्ञान असा नारा दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संशोधनाचे महत्व लक्षात घेत या घोषणेमध्ये जय अनुसंधान असा नारा जोडला आहे. म्हणजे आता हा नारा ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ असा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजयसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांना मुलाखत दिल्यानंतर आज पंजाबमधून मोदींनी आपल्या प्रचार अभियानास सुरुवात केली आहे. गुरुवारी(3 जानेवारी) जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे इंडियन सायन्स काँग्रेसचे उदघाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच संशोधनालाही महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणांमध्ये जय अनुसंधान हा नाराही जोडला.

”शेकडो वर्षांपासून संशोधक जे संशोधन करत आहेत. त्याचा फायदा देशाला मिळणार आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. माजी पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान यांच्यासोबत जय विज्ञान असा नारा दिला होता. आता मी यामध्ये जय अनुसंधान या नाऱ्याची भर घालतो.” असे मोदी यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे पिकांचे उत्पन्न वाढले आहे. पण अजूनही नवभारता समोर असलेले आव्हान पाहता यामध्ये वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मतदान केंद्रात चक्क ‘नमो फूड’, कोतवाली सेक्टर २०मध्ये गोंधळाचे वातावरण

News Desk

‘मविआ’चे चारही उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार’; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

Aprna

संजय राऊतांच्या ED च्या कारवाईबाबत अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Aprna