HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारची गत नव्या नवरीसारखी !

नवी दिल्ली | “मोदी हे नव्या नवरीसारखे आहेत. जी काम कमी करते आणि बांगड्याच जास्त वाजवते. मोदी सरकारची गत देखील तशीच आहे”, असे वादग्रस्त विधान करत माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर येथे प्रचारसभेत शुक्रवारी (१० मे) सिद्धू यांनी पंतप्रधान मोदींवर ही टीका केली आहे.

“मोदी हे नव्या नवरीसारखे आहेत. जी भाकऱ्या कमी भाजते, पण तिच्या बांगड्यांचा आवाजच जास्त असतो. मोदी सरकारची गत तशीच आहे”, असे सिद्धू यांनी म्हटले आहे. “हिरो नंबर १, कुली नंबर १, बीवी नंबर १ हे चित्रपट तुम्ही पाहिलेच असतील. पण आता पंतप्रधान मोदींचा नवा चित्रपट येतोय. या चित्रपटाचे नाव आहे ‘फेकू नंबर १’”, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध

News Desk

चहाचा रिकामा कप देणाऱ्याच्या हातात देशाची सत्ता, मागासवर्गीय असणे अभिशाप

News Desk

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे हे धक्कादायक !

News Desk