Site icon HW News Marathi

शिंदे गटाने गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमधील मुक्काम हलविला; गोव्याच्या दिशेने रवाना

मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारले आहे. गेल्या आठवड्या भरापूर्वीच आमदारांनी बंड पुकारून गुजरातच्या सुरत येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस राहिले होते. यानंतर सर्व बंडखोर आमदार सुरतहून विमानाने गुवाहाटी येथील रॅडिसन हॉटेलमध्ये मुक्कामी होते. तब्बल आठ दिवसांनतर बंडखोर आमदारांनी आज (29 जून) हॉटेलमधील त्यांचा मुक्काम हलविला. सर्व आमदार गुवाहाटीनंतर गोव्याच्या दिशेने रवाना झाले असून उद्या (30 जून) विश्वासदर्शक ठरावा येणार आहेत.

हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीवरून विमानाने तीस तासानंतर गोव्यात दाखल होणार आहेत. सर्व आमदार गोव्याच्या ताज हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती माध्यमांनी प्रसारित केली आहे. “आम्ही उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार आहोत,” अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. शिंदेंनी आज  गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन गेले होते. दर्शनानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सर्व बंडखोर आमदार उद्या मुंबईत विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईला पोहोचणार आहोत. ठरावानंतर आमदारांची बैठक होणार असून यात पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धी आणि समाधानासाठी मी देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. आम्ही उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार आहोत. राज्यपालांनी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. आम्ही उद्या सर्व आमदारांसह विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईला पोहोचणार आहोत. ऐवढच मी तुम्हाला आता सांगू इच्छितो.” तुम्ही कोणाला समर्थन करणार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. शिवसेनेच्या आमदाराच्या रुपात आम्ही विधीमंडळात पोहोचणार आहोत.”

संबंधित बातम्या
“सर्व आमदार उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार,” एकनाथ शिंदेंची माहिती

 

 

 

Exit mobile version