HW News Marathi
राजकारण

एमपी मिल कंपाऊंड घोटाळा प्रकरण | मनाची लाज ठेऊन मेहतांनी राजीनामा द्यावा !

मुंबई | “ताडदेव मिल कंपाऊंड घोटाळ्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत विरोधी पक्षाने सभागृहात केलेल्या आरोपांवर लोकयुक्तांनी शिक्कामोर्तब केला आहे. आता किमान जनाची नाही तर मनाची लाज ठेऊन मेहतांनी ताबडतोब राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा”, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मेहतांचा राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देखील धनंजय मुंडे यांनी केला आहे. “इतकेच नव्हे तर मंत्री म्हणून त्यांनी आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडली नाही असा गंभीर आरोपही केला आहे. त्यामुळे सतत क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पडले आहे”, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “हे केवळ हिमनगाचे एक टोक असून भ्रष्टचाराचे थैमान घालणाऱ्या १६ मंत्र्यांच्या गैरकारभरातील सत्य हळूहळू बाहेर येईल”, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामा हल्ल्याप्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर राज ठाकरेविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी

News Desk

गुजरात निवडणुकांसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले

Aprna

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा थेट मंत्रालयावर धडकणार !

News Desk