Site icon HW News Marathi

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह टीकेनंतर सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया म्हणाल्या…

मुंबई | “आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया”, असे आवाहन करत संयमी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका केलेली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या औरंगाबादेतील घरावर दगडफेक केली. सत्तारांनी सुळेंवर केल्या आक्षेपार्ह टीकेवर राज्यभरातून संतप्त व्यक्त होत आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी तीन ट्वीट करत सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळेंनी सत्तारांनी ट्वीट करत म्हणाले, “महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे बोलणे-वागणे ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात,” असे त्यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हणाले. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले, “मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया.”

सुप्रिया सुळेंनी तिसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले, “याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र !” असे म्हणाल्या आहेत.

अब्दुल सत्तार नेमके काय म्हणाले

सुप्रिया सुळेंनी सत्तारांवर टीका करताना म्हणाले, “पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का?” सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत सत्तार म्हणाले, “ते तुम्हाला हवे आहेत का?, असे त्यांनी म्हटले. या विधाननंतर पुन्हा एकदा सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करत आहात”, असे म्हणत सत्तारांच्या ऑफरला त्यांनी उत्तर दिले. यावर उत्तर देताना सत्तारांची जिभ घसरली ते म्हणाले, “इतकी भिकारी*** झाली असेल तर सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ,” असे म्हणाले.

संबंधित बातम्या

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा फोन, म्हणाले…

“महाराष्ट्रातल्या किंवा देशातील महिलांचे मन दुखावले असतील तर…”, अब्दुल सत्तारांची टीकेनंतरची प्रतिक्रिया

अब्दुल सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

 

Exit mobile version