HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शिवकुमार यांच्यासह नसीम खान, मिलिंद देवरा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | कर्नाटकातील हायव्होल्टेज ड्रामा नवीन वळण आले आहे. नाराज आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आलेले काँग्रेसचे संकटमोटक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे मंत्री डीके शिवकुमार आमदार नसीम खान आणि  काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे याठिकाणी तवाणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रेनेसॉंस हॉटेलमधील मागच्या बाजून प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना शिवकुमार यांना पोलिसांनी पकडले.

शिवकुमार, नसीम खान आणि मिलिंद देवरा यांना मुंबई पोलिसांनी  ताब्‍यात घेऊन कलीना रेस्ट हाऊसमध्ये नेहण्यात आले. मुंबई पोलिसांनी या सर्वांना रेनेसॉंस हॉटेलबाहेरून ताब्यात घेतले आहे. परंतु शिवकुमार यांनी हार न मानता आमदारांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. यानंतर परिसरातील परस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी हॉटेल परिसरात संचारबंदी लागू केली आहे. शिवकुमार यांनी आज (१० जुलै) मुंबईतील पवई येथील रेनेसॉंस हॉटेलमध्ये बुकिंक असून देखील त्यांना आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगत हॉटेलमध्ये प्रवेश करून शकला नाही.

 

 

 

 

Related posts

सांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी

News Desk

दिल्लीत ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला गेल्याचा केजरीवालांचा दावा

News Desk

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी डी. के. शिवकुमार यांनी ईडीकडून अटक

News Desk