Site icon HW News Marathi

बाळासाहेब ठाकरेंचे ‘हे’ स्वप्न उद्धव ठाकरे पूर्ण करणार; औरंगाबादच्या सभेत दिले संकेत

मुंबई। औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करावे, हे स्वप्न माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. आणि मी ते विसरलेलो नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाण साधला. मुख्यमंत्र्यांनी काल (८ जून) औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या 37 व्या वर्धापना निमित्ताने आयोजित सभेतून औरंगाबादचा पाणी प्रश्न, काश्मीर पंडित आदी मुद्द्यांवर भाजप आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला. मुख्यमंत्र्यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडली.
विरोधक म्हणतात औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करा, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपची सत्ता होती,  तेव्हा सुचत नव्हते. सत्ता गेल्यावर एकदम अंगात येते की, औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर कधी करणार?,  आता हे आपल्याला यांनी सांगायचे?,  औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचे वचन माझ्या वडिलांनी शिवसेना प्रमुख हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे. मी ते वचन विसलेलो नाही, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. “
भाजपच्या प्रवक्त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचरा कुंडीवर
“भाजप नेत्याने प्रेषीतांचा अपमान काय केला. काय संबंध यांचा तुमचा आपण म्हणतो की, आपल्या देवीदेवतांचा अपमान करायचा नाही,असे आपण म्हणतो. तसेच कोणाच्या देवांचा अपमान करायची तुम्हाला गरज नाही. या अपमानामुळे अरब देश एकत्र आले आणि त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावर आणले. त्या सर्वांनी आपल्या देशाला माफी मागायला लावली. आणि देशाच्या पंतप्रधान फोटो कचरा कुंडीवर ही परिस्थिती भाजपने लावला.”
संबंधित बातम्या
देशाच्या पंतप्रधान फोटो कचरा कुंडीवर ही परिस्थिती भाजपने लावला! – उद्धव ठाकरे

 

Exit mobile version