HW News Marathi
राजकारण

…म्हणून माझी बहिण मला तुरुंगात पाठविण्याच्या प्रयत्नात !

बीड ।“मी चिक्की घोटाळा उघडकीस काढला म्हणून माझी बहिण मला तुरुंगात पाठविण्याच्या प्रयत्नात आहेत”, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महिला विकास आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे. विधानसभेकरिता राष्ट्रवादीची पहिली यादी काहीच दिवसांपासून जाहीर करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नाव न घेता पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधत धनंजय मुंडे म्हणाले की, “या धनंजय मुंडेला तुरुंगात पाठविण्यासाठी तुम्हला १० जन्म घ्यावे लागतील तरी तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाहीत.”धनंजय मुंडे परळी मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय वैर उभा महाराष्ट्र जातो. त्यातच यंदा राष्ट्रवादीकडून परळीतून धनंजय मुंडे यांना उमेदवारी मिळाल्याने आता परळी मतदारसंघात मुंडे भावा-बहिणीमध्ये मोठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

“विधान परिषदेचा विरोधीपक्ष नेता असताना मी भाजपच्या २२ मंत्र्यांचे घोटाळा उघडकीस काढला होते. त्यामध्ये माझ्या बहिणबाईचा चिक्की घोटाळा देखील उघडकीस आणला होता. मी माझ्या विरोधीपक्षाच्या पदाशी काशी बेईमानी करू ? म्हणून माझी बहिण सूडबुद्धीने त्या कारणावरून मला तुरुंगात पाठविण्याचे षड्यंत्र रचत आहे”, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आल्या किरण खेर आयोगाने पाठविले नोटीस

News Desk

मंत्री महादेव जानकर यांना दिलासा

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल मागासवर्ग आयोगाकडून मुख्य सचिवांकडे सुपूर्द

News Desk