HW News Marathi
राजकारण

नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होणार

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचे निश्चित झाले आहे. येत्या १ सप्टेंबरला गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत विलीन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांचे निलेश आणि नितेश दोन्ही चिरंजीव भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थिती नारायण राणे त्यांचे पक्षाचे विलीनकरण होणार आहे. नारायण राणे गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. कोकणातील प्रभावशाली नेते मानले जातात. राणे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेमधून झाली आहे.

राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शाखाप्रमुख ते युती सरकारच्या शेवटच्या वर्षात मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी न जुळल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली. शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी पूर्णपणे विरुद्ध विचारधारेच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अखेर त्यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान

News Desk

फुंडकरांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा

News Desk

पंढरपूरच्या सभेतून शिवसेना फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

News Desk