HW News Marathi
राजकारण

जे औरंगजेब देखील करु शकला नाही ते नरेंद्र मोदी करु शकतात !

नवी दिल्ली | “पंतप्रधान मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत. जे औरंगजेब देखील करु शकला नाही ते नरेंद्र मोदी करु शकतात”, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे. संजय निरुपम हे मंगळवारी (७ मे) वाराणसीत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “वाराणसीच्या लोकांनी ज्या व्यक्तीला निवडून दिले, ती व्यक्ती औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहे”, असा शाब्दिक हल्ला संजय निरुपम यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर चढवला.

“वाराणसीच्या जनतेने ज्या व्यक्तीला निवडून दिले, ती व्यक्ती औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहे. वाराणसीत महामार्गाच्या कामासाठी शेकडो मंदिरे पाडण्यात आली. विश्वनाथ मंदिरात केवळ दर्शनासाठी ५५० रुपये आकारले जातात. या सर्व गोष्टींवरून हेच स्पष्ट होते की जे औरंगजेब देखील करु शकला नाही ते नरेंद्र मोदी करु शकतात”, अशी बोचरी टीका संजय निरुपम यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मातोश्री’नंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संभाजी भिडे ‘वर्षा’वर

News Desk

चंद्रकांत पाटलांचे विठुरायाला साकडे

News Desk

जनतेसोबत मोदींच्या संवादाला सुरुवात

swarit